साहित्य : बेसन 125 ग्रॅम, दही 250 ग्रॅम, बारीक चिरलेले कांदे 2, हिरव्या मिरच्या 2-3, 5-6 लाल मिरच्या, 1/2 चमचा मेथीदाना, 1 चमचा आल-लसनाची पेस्ट, 1 चमचा तिखट, चिमुटभर हळद, चवीप्रमाणे मीठ, तेल व तूप.
विधी : 100 ग्रॅम बेसनात तिखट, मीठ, कांदे, हिरव्या मिरच्या घालून पाण्याने चांगले फेटावे. नंतर तेल गरम करून त्यात या मिश्रणाचे भजी तळून काढावे. उरलेल्या बेसनात दही, मीठ, हळद, तिखट आणि पाणी मिसळून पातळ घोळ बनवून घ्यावे. तूप गरम करून त्यात मेथीदाना व साबुत लाल मिरच्या परताव्या व नंतर लसन-आल्याचे पेस्ट त्यात टाकून ते परतावे.
पेस्ट मधून जेव्हा तूप वेगळ दिसायला लागेल तेव्हा त्यात बेसनाचा घोळ टाकावा. याला मंद आचेवर ठेवून हालवावे. जेव्हा बेसन पूर्णपणे तयार होईल तेव्हां भजी तळावी. 5 मिनिटाने कढी-भजी तयार असेल. या कढी-भजीला गरमागरम पोळ्यांसोबत वाढावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा