Publish Date: Tue, 03 Feb 2015 (17:54 IST)
Updated Date: Tue, 03 Feb 2015 (17:58 IST)
साहित्य : सव्वाशे ग्रॅम पनीर, दोन मोठे चमचे घट्ट चक्का, दोन-तीन हिरव्या मिरच्या, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी बारीक चिरलेली काकडी, पाव वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, थोडी चिरलेली कोथिंबीर, दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस, ब्रेडचे स्लाईस आणि लोणी, चवीनुसार मीठ.
कृती : सर्वप्रथम पनीर, चक्का, मीठ, मिरची आणि टोमॅटो सॉस एकत्र करून मिक्सरमधून काढावं. त्यात चिरलेला कांदा, काकडी, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र मिसळावं. ब्रेडच्या स्लाईसवर हे मिश्रण लावून त्यावर ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवावी आणि सॅन्डविच तयार करून ते लोणी लावून भाजावं.