साहित्य : १-२ उकडलेले बटाटे, पावभाजी मसाला, १ कांदा, १ टॉमेटो, ८ पावाच्या स्लाईस.
कृती : उकडलेले बटाटे सोलून कुस्करावेत. तव्यावर तेल
WD
आणि जिरा फोडणी करुन त्यात कांदा आणि टॉमॅटो बारीक चिरुन मऊ होईपर्यंत परतावे. आता पावभाजी, उकडलेला बटाट्याचा लगदा आणि पावभाजी मसाला (अथवा कोणताही आवडता मसाला) आणि मीठ टाकून थोडावेळ परतावे. मिश्रण प्रवाही नसावे.
घट्टसर असावे. पावावर या मिश्रणाचा थोडा जाड थर
WD
देऊन वर दुसरी स्लाईस लावावी. आणि तव्यावर तेल वा लोणी थोडे टाकून सोनेरी भाजावे. कडा बंद करण्यासाठी आपण पावांच्या आत भाजीच जाड थर दिलेला असेल तो थोडा कडांच्या बाहेर आलेला असेलच. पाव उभे करुन चारी कडा थोडावेळ परताव्या. बाहेर आलेली भाजी २ पावाना चिकटवण्याचे काम करेल.