Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%ae %e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%87 107072300003_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोह्याचे गरमागरम वडे

पोह्याचे गरम गरम वडे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : पातळ पोहे १ पाव, १-१/२ वाटी बेसन, बारीक चिरलेला कांदा १ वाटी, आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तळण्यासाठी तेल, हळद, तिख़ट, जिरे पावडर आणि मीठ (चवीनुसार), बारीक चिरलेली कोथिंबिर.

NDND
कृती : पातळ पोहे थोड्या पाण्यामध्ये ५ मिनिटे भिजत घालावे. नंतर एका पातेल्यात भिजलेले पोहे, बेसन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबिर, आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट व हळद, तिख़ट, जिरे पावडर आणि मीठ घालावे. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे.

थोडे गरम तेल वरील साहित्यात टाकावे व हे सर्व व्यवस्थित एकत्र करावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून वडे थापून तळता येतील इतपत भिजवावे. त्यानंतर चपटे वडे हातावर थापून लालसर होईपर्यंत तळावे. वड्यांचा हा वेगळा प्रकार खायलाही रूचकर लागतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi