साहित्य : चण्याची डाळ 4 वाट्या, दही एक वाटी, सोडा, मीठ, आले, ओल्या मिरच्या, कोथिंबीर, हिंग, धने, सारख, तेल.
कृती : चण्याची डाळ साधारण जाडसर दळून घ्यावी. त्यात दही घालावे व पाच-सहा चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. चवीप्रमाणे मीठ व ओल्या मिरच्या वाटून, धने व हिंग यांची पूड करून, आले वाटून, कोथिंबीर चिरून व चवीप्रमाणे साखर घालून, पीठ दोन तास भिजवून ठेवावे. पीठ भज्याच्या पिठाप्रमाणेच भिजवावे. तळण्याच्या वेळी अर्धा चमचा सोडा घालून, पीठ कालवून घेऊन, भजी गोल करून तळावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा