Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ad%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%a8 %e0%a4%96%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%97 %e0%a4%a2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a5%87 108021100011_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भगरीचे (मोरधन) खमंग ढोकळे

भगरीचे मोरधन खमंग ढोकळे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
NDND
लागणारे जिन्नस :
भगरीचे पीठ 100 ग्रॅम, राजगीरा पीठ 50 ग्रॅम, शिंगाड्याचे पीठ 50 ग्रॅम, शेंगदाणे 1 वाटी, एक चमचा तेल, 8-10 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चिमूट नींबू पावडर, एक चिमूट खाण्याचा सोडा, जीरे, चवीनुसार मीठ.

कृती :
भगरीचे पीठ, शिंगाड्याचे पीठ, राजगीरा पीठ एकत्र करून भज्यांचे पीठ भिजवतो तितके पातळ भिजवून घ्या. यात मीठ, सोडा, नींबू पावडर टाकून फेटून घ्या. कूकरच्या डब्याला तेल लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओता. कूकरला शिट्टी न लावता १० मिनीट वाफवून घ्या. ईडली पात्रसुद्धा वापरता येते.

एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे, हिरवी मिरची, शेंगदाणे टाका. त्यात तयार केलेले ढोकळे परतवून घ्या. गॅसवरून उतरवून कोथिंबीर, टोमॅटो सॉस टाकून गरमागरम ढोकळे सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi