Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भरली वांगी

भरली वांगी
साहित्य : ५00 ग्रॅम कोवळी लहान वांगी, अर्धी वाटी खोबर्‍याचा कीस, २ टे स्पू. तीळ, २ टे. स्पू. शेंगदाण्याचा कूट, २ टे. स्पू. धने-जिरेपूड, २ टे. स्पू. काळा मसाला, लाल तिखट, मीठ, हळद, १ टे. स्पू. किसलेला गूळ, फोडणीसाठी (जिरे, मोहरी, कढीपत्त्याची पानं, हिंग, मेथीदाणे) अर्धी वाटी खोवलेलं खोबरं आणि कोथिंबीर.

कृती - खोबर्‍याचा कीस व तीळ खमंग भाजून पूड करावी. शेंगदाण्याचा कूट, खोबर्‍याची पूड, तीळ पूड, धने- जिरेपूड, काळा मसाला, चवीनुसार लाल तिखट, मीठ, गूळ, हळद सर्व मिक्स करून हे मिश्रण पाणी टाकून बारीक वाटून घ्यावं. वांग्याची देठं काढून वांगी उभी चार फाका होतील अशा पद्धतीनं त्याला चिरा द्याव्या. वांगी पूर्ण कापू नये. वांगी चिरा देऊन मिठाच्या पाण्यात टाकावी. वांगी पाण्यातून काढून वाटलेला मसाला त्यात दाबून भरावा. कढईत तेल तापवून फोडणीचं साहित्य टाकून त्यात भरलेली वांगी टाकावीत. वांगे चांगले परतून घेऊन उरलेला मसाला टाकून ते परत परतावे. पाणी टाकून शिजू द्यावे. साधारण घट्ट रस्सा झाल्यावर खोवलेलं ओलं नारळ व कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्या घरी आहे का हे औषधे