Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a4 108061400002_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भेंड्यांचे भरीत

भेंड्यांचे भरीत पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
P. Barnale
साहित्य : भेंड्यांचे पातळ काप दोन वाट्या, एक वाटी गोड ताक, एक वाटी गोड दही, पाव वाटी दाण्याचे कूट, ओले खोबरे, कोथिंबीर, चार-पाच ओल्या मिरच्या, मीठ साखर, फोडणीचे साहित्य, तूप किंवा तेल.

कृती : चार चमचे तेलाची किंवा तुपाची जिरे व हिंग घालून, फोडणी करून, त्यात भेंड्यांचे काप घालून, काप तांबूस होईपर्यंत परतावेत. नंतर खाली उतरवून थंड झाल्यावर त्यात ताक, दाण्याचे कूट, खोबरे, कोथिंबीर (चिरून), ओल्या मिरच्या वाटून चवीप्रमाणे मीठ, साखर असे सर्व जिन्नस एकत्र घालून कालवावे. वाढावयाच्या वेळी त्यात दही घालून भरीत सारखे करून वाढावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi