साहित्य : साबुदाणा पीठ पाव वाटी, राजगिरा पीठ 3 वाटी, वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा, पाव वाटी दाण्याचे बारीक कूट, अर्था चमचा जिरेपूड, पाव वाटी दही, चवीनुसार शेंदेमीठ, मोहनासाठी तेल.
कृती : एका भांड्यात राजगिर्याचे पीठ घ्या. साबुदाणा पीठ, दाण्याचे कूट, वाटलेली हिरवी मिरची व जिरेपूड घाला, शेंदेमीठ घाला, कडकडीत तेलाचे मोहन घाला, थोडे दही घालून सारखे करून घ्या, व हव्या त्या प्रमाणात पाणी लावून पीठ मळून घ्या. लहान-लहान आकारात राजगिर्याचे पीठ लावून पुर्या लाटून घ्या. गरम तेलावर पुरी लालसर रंगावर तळून घ्या. बटाट्याच्या भाजीसोबत खायला द्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा