Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2 %e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%9a%e0%a5%87 108050900045_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाल मिरच्यांचे लोणचे

लाल मिरच्यांचे लोणचे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 5 किलो लाल ढब्बू मिरच्या, 2 चमचे ओवा, 2 चमचे कालुंजी, 4 चमचे बडीशोप, 2 चमचे मेथी, 4 चमचे मोहरी, 4 चमचे आमचूर, 1 चमचा तिखट, 3 चमचे हिंगाची पूड, 2 चमचे गरम मसाला, 3 चमचे धने, 2 चमचे हळद, 1/4 किलो मोहरीचे किंवा रिफाइंड तेल.

कृती : मिरच्या जाड व बुटक्या ढब्बू - अशा ओल्या लाल रंगाच्या घ्याव्यात. त्या देठांसकट घ्याव्यात. ओवा, कालुंजी, बडीशोप, मोहरी व धने हे जिन्नस गरम करून व किंचित कुटून घ्यावेत. मिरचीचे बरचे तोंड देठासकट काढून आतील दांड्याला बी चिकटलेले असते, तो दांडाच देठासकट काढावा. मिरच्यांमध्ये असलेले सर्वच बी काढून घ्यावे.

ते बी, कुटलेले मसाल्याचे जिन्नस आमचूर, मीठ, हिंगपूड, हळद, तिखट, गरम मसाला व गोडे तेल असे एकत्र कालवून ते मिश्रण पोकळ मिरच्यांत भरावे. तेल तापवून गार करून, एका पातेल्यात घालावे व त्यात एक एक मिरची बुडवून घ्यावी व एका काचेच्या बरणीत त्या मिरच्या उभ्या ठेवाव्यात. मिरच्यांवर थोडे तेल घालावे आणि बरणी थोडे दिवस उन्हात ठेवावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi