Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाही दहीवडे

शाही दहीवडे
सामग्री : 
500 ग्रॅम उकळलेले बटाटे, 100 ग्रॅम पनीर, 500 ग्रॅम मैदा, 50 ग्रॅम खोबऱ्याचा कीस, 25 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, दो-तीन बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा शौफ, चवीनुसार मीठ, व अर्धा चमचा लाल मिरचीची पूड.

चटणीसाठी :
25 ग्रॅम गूळ, 25 ग्रॅम चिंच, अदरक, अर्धा चमचा लाल मिरचीची पूड, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा तूप.

पद्धती : मैदा, मीठ, बटाटा व पनीर एकजुट करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्या. त्या गोळ्यांच्या आत खोबऱ्याचा कीस भरून पुन्हा त्यांना गोल करून घ्या. कढईत तेल गरम करण्यास ठेवा. तेल चांगले तापल्यावर एक-दोन गोळे गरम तेलात टाकावे व राखाडी रंगाचे होईस्तर ते तळावे.

चटणी तयार करण्याची पद्धत :
गूळ व चिंच अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवण्यासाठी ठेवा. चांगल्या पद्धतीने ते भिजल्यानंतर त्याला कुचकरून घ्या. गॅसवर ठेवलेल्या कढईत चमचाभर तूप टाकून त्यात जिरे टाका व त्यानंतर त्यात गूळ व चिंचेचे पाणी टाका. लाल मिरचीची पूड व मीठ टाकून त्याला चांगले फेटून घ्या. दही ऐका कापडात घेऊन त्यातील पाणी नितारून घ्या.
वडे प्लेटमध्ये ठेवा व त्यावर दही व तयार केलेली गूळ व चिंचेची चटणी टाका. चवी व आवडीनुसार लाल मिरचीची पूड घ्या. शाही दहीवड्यांवर बारीक केलेल्या हिरवी मिरची व कोथिंबीर टाका.

Share this Story:

Follow Webdunia marathi