साहित्य : 250 ग्रॅम कारले, 1/2 वाटी दाण्याचा कूट, 1 चमचा शोप, चुटकीभर हिंग, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार.
कृती : कारले सोलून त्यांना मधून चिरा देऊन त्यातील बिया काढून घ्यावा व त्यात मीठ भरून ठेवावे. नंतर उकळत्या पाण्यात ते कारले 5-10 मिनिट वाफवून घ्यावे. कारले चांगल्या प्रकारे उकळल्यावर चाळणीत घालून त्याचे पाणी काढून घ्यावे. एका प्लेटमध्ये वर दिलेले साहित्याचे मिश्रण तयार करून घ्यावे. आता ते मिश्रण कारल्यात भरून त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यावे.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे व शोप घालून फोडणी द्यावी व भरलेली कारली कढईत टाकून 5-7 मिनिट परतून गॅस बंद करून द्यावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा