Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%87 107090300004_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सामोसे

सामोसे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : ५-७ बटाटे, गाजर, शावणघेवडा, मटर, काजु, बेदाणे, धने, जिरे, मिरे पुडी, तिखट, मीठ, चवी पुरती साखर, तेल, चटण्या, मैदा.

कृती: बटाटे उकडून घ्यावेत. सोलून ते कुस्करावे. किसलेले गाजर, श्रावणघेवड्याच्या शेंगाचे बारिक तुकडे आणि टर हे मध्यम शिजवून घ्यावे. बटाटे व बाकिच्या भाज्या एकत्र कराव्या त्यांत तिखट, मीठ, (हवी असल्यास साखर घालावी. त्यात हवे असतील काजू आणि बेदाणे पण घालावे. धने, जिरे, मिरपूड आवडी प्रमाणे घालावे.

NDND
समोसे करायच्या 1 तास आधी मैदा पाण्याने भिजवून घ्यावा. नंतर हातात घेऊन नरसाळ्यासारखा आकार करून त्यात बटाटा/भाजीचे सारण भरायचे. त्याच्या कडांना मैद्याच्या पेस्टचा हात लावून त्रिकोणी सामोसे बंद करायचे. असे सर्व तयार करून झाल्यावर ते कढईमध्ये खरपूस तळायचे.

याच्या बरोबर टोमॅटोची तयार चटणी (केचप), पुदिन्याचि चटणी किंवा चिंच गुळाची गोड चटणी यापैकि जी किंवा जितक्या आवडतील त्या सामोषाची लज्जत आणखी वाढवतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi