Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधुनिक स्त्री

आधुनिक स्त्री
महिला या शब्दाबरोबर प्रेम, वासल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी रहाते. कारण आता स्त्रीही अबला राहिलेली नाही. ती सबलाही झालेली आहे.

एकविसाव्या शतकात स्त्रीने स्वत:ची शक्ती ओळखली आहे. ती आपल्या अधिकारांसाठी झगडणेही शिकली आहे. आजच्या स्त्रीने सिद्ध केले आहे, की त्या एकमेकांच्या शत्रू नाहीत तर सहकारी आहेत. स्त्री सशक्त आहे. आणि तिच्या शक्तीची अभिव्यक्ती याप्रकारे पाहावयास मिळत आहे.

स्त्री-भ्रुण हत्येच्या कलंकित गोष्टी अनेकदा ऐकावयास मिळतात. ‍त्याचवेळी समाजात मुलींना जन्म देऊन प्रसन्नपणे सांभाळणारी आईदेखील पाहावयास मिळत आहे. अशी बरीचशी कुटुंबे आपल्या जवळपास सापडतील की ज्यांना फक्त एकच मुलगी आहे किंवा दोघीही मुलीच आहेत. आणि त्या आई-वडिलांच्या लाडक्या आहेत. त्या आई-वडिलांचीही काळजी घेत आहेत.

ND
मुली दत्तक घेतल्या जात आहेत:
मुलींना दत्तक घेऊन त्यांचे अगदी प्रेमाने पालन-पोषण करणारीही कुटुंबे आहेत.

मुलींना उच्च शिक्षण देणे:
आज जवळपास सर्वच सुसंस्कृत आणि सुशिक्षित कुटुंबामध्ये मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कर्जदेखील घेतले जात आहे.

webdunia
ND
लग्नापूर्वीच शिक्षण:
मुली शिकून काय करणार? शेवटी त्यांना चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे अशा रूढिवादी परंपरा झुगारून देऊन लग्नाआधीच त्यांना शिक्षण देणे, आत्मनिर्भर करणे ही मानसिकता विकसित झाली आहे.

मुलीच्या घरही आपले मानणे:
मुलीच्या घरचे पाणीही वर्ज्य मानणार्‍या समाजात लोकं मुलीच्या घरी येऊन राहू लागली आहेत. आणि त्यांच्याकडून भेटवस्तूदेखील प्रेमाने आणि गर्वाने स्वीकारू लागली आहेत.

संपतीचे अधिकार:
webdunia
ND
मुलींना कायद्याने संपत्तीत अधिकार तर मिळालेच आहेत पण वडीलही तिला आपल्या संपत्तीचा अधिकार देऊ लागले आहेत. समजदार भाऊदेखील त्यात सहकार्य करीत आहेत.

'मुलगा' निवडण्याचे स्वातंत्र:
लग्नासाठी 'वर' पसंत करताना तिच्या मतालाच प्राधान्य दिले जात आहे.

webdunia
ND
आत्मविश्वासात वृद्धी:
उच्च शिक्षणासाठी मुली लहान-लहान शहरातून मोठ्या शहरांमध्ये येऊन राहणे, नोकरी करणे, आपली ओळख निर्माण करणे यामुळे त्यांच्या आत्मविश्यास वाढीस लागला आहे. आपल्या देशातच काय पण विदेशात जाऊ लागली आहे.

अभिव्यक्तीची स्वतंत्रता:
आत्मविश्वासासोबतच आपले मत ठामपणे मांडणेही ती शिकली आहे. घराच्या संरक्षण कवचातून बाहेर येऊन तिने अभिव्यक्ती स्वातंत्र स्वत:च मिळविले आहे.

अन्यायाचा विरोध:
आजची आधुनिक तरुणी अन्यायाचा विरोध करण्याच्या परिणामांना न जुमानता अन्यायाचा विरोध करते आहे.

webdunia
ND
पतीची खरी मैत्रीण:
आजची स्त्री खर्‍या अर्थाने सखी-सहचारिणी बनली आहे. ती पतीची दु:ख वाटून घेण्यातही सक्षम झाली आहे. ती पत्नी बनून फक्त त्याने दिलेल्या सुख-सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख-सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. संघर्ष करू लागली आहे.

webdunia
ND
यशस्वी आई:
शिक्षित आणि घराबाहेर जाऊन कमावू लागलेली आजची आई मुलांप्रतीही अधिक जागरूक आणि संवेदनशील बनली आहे. मुलांचे पालन-पोषण करतानाच ती त्यांना निर्णय घेण्यातही भागीदार बनली आहे. मुले ही आपल्या आईच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगू लागली आहेत.

माहेर-सासर यामधील दुवा:
आजची स्त्री खर्‍या अर्थाने सासरसंबंधी आपले कर्तव्य पूर्ण करीत असताना माहेराप्रती असणारे कर्तव्यही पार पाडीत आहे.

webdunia
ND
एकमेकांची सहकारी:
'स्त्रीच स्त्रीची शत्रू असते' हा कलंक देखील तिने पुसून टाकला आहे. सासू-सून यांच्यातील युद्ध आता फक्त टी.व्ही. मालिकांमधूनच पाहावयास मिळत आहे. कारण आजच्या सासू सूना एकमेकांच्या वैरी नाही तर मैत्रिणी बनल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi