यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या आणि आपापल्या क्षेत्रातील नावाजलेल्या महिलांमध्ये असे काय असते? ज्यामुळे त्या यशस्वी ठरल्या? त्यांच्याच तोंडून हे जाणून घेऊ या...
इंद्रा नुयी (सीईओ, पेप्सिको)
''महिला असल्यामुळे तुम्हाला दुसर्यांपेक्षा अधिक चतुराईने काम करावे लागते. कारण महिला असल्यामुळे तुम्हाला स्वत:ची ओळख निर्माण करणे इतरांपेक्षा फारच कठीण असते.''
नीता अंबानी (उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी व समाजसेविका)
''दुसर्यांच्या भल्यासाठी पैशांचा वापर करण्याने अधिक आनंद मिळतो. माझा अनुभव सांगतो की दुसर्यांच्या कल्याणासाठी खर्च करणे चांगली गोष्ट आहे.''
फराह खान (चित्रपट दिग्दर्शिका)
''मला वाटते की पॉवरचा अर्थ आहे तुमच्यात असलेली निर्णय क्षमता. खास करून तुम्हाला काय हवे आहे याचा निर्णय घेण्याची. आणि आवश्यक असल्यास 'नाही' म्हणण्याचा अधिकारही तुमच्या निर्णयक्षमतेत येतो.''
बरखा दत्त (पत्रकार)
''मला वाटते की आजच्या काळात चांगली आणि धाडसी पत्रकारितेचा काहीसा हाच अर्थ आहे.''
शबाना आझमी (अभिनेत्री)
''मी चुकीच्या गोष्टींवर गप्प राहू शकत नाही. मी परिणामांची काळजी केल्याशिवाय त्या विरोधात आवाज उठविते.''
किरण मजूमदार शॉ (उद्योजिका)
''मी त्या प्रत्येक आधुनिक महिलेचे प्रतिनिधित्व करते, जी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असते.''