कोण म्हणतात अस्पृश्यता नष्ट झाली?
तुमची आमची आई बहिण मुक्त झाली?
कधी कधी आम्ही, त्यांच्या कडून ऐकलंय
'स्त्री मुक्ती' आणि 'अस्पृश्यता'
हे सगळं आता 'आऊटडेटेड' झालंय!
म्हणतात ना ते स्त्री 'मुक्त' झाली,
आता तुम्हीच विचार करा,
तिची किती बंधनं, आम्ही सैल केली?
तिचा एक तारखेचा पगार
हातात नाही रोख मिळाल्यावर
करताता बदफैलीचे आरोप तिच्यावर
स्त्री 'मुक्त' झाली म्हणतात आणि वर!
शतकानुशतके गाजवली तिच्यावर सत्ता,
मनाविरूद्ध थोडं जरी घडलं,
घालतात उठून तिलाच लाथा,
पहातही नाहीत ती कोणाची
आहे बहिण की आहे माता,
स्त्री 'मुक्त' झाली वर आणखी म्हणता?
त्यांच्यामते अस्पृश्यता नष्ट झाली
मान्य आहे, तिची आता धार थोडी कमी झाली
पूर्वी ती वस्त्रविना पूर्णपणे उघडी होती
आता ती वस्त्रे ल्याली, लाज झाकली,
पण शुगर कोटेड गोळी सारखी
आहे तशीच कडू राहिली, आणखी कडवट होत राहिली!