जिवंत आहे म्हणतेस!
निपचित शरीरान जगणारी
मन मारुन दुःख झेलणारी
दबक्या श्वासाने वावरणारी
मिंध मुक्यानं भयभित जगणारी
कुणाकुणाच्या तालावर नाचणारी
स्वतःला विसरुन वेदना पिणारी!
क्षणाक्षणाला मरणं जगणारी!....
आता जीवन जग स्वतःचे
ते जड ओझे झुगारुन द्यायचे
इतरांच्या इच्छा आकांक्षाचे!
ऐक आपल्या आंतर मनाचे !
फुलं ओंजळीत सुगंधी प्रेमाचे
पांघर चंदेरी वस्र आनंदाचे !
जागव तुझा आत्मविश्वास
सई घे मोकळा श्वास!!....
- मीना खोंड