त्याने तिला विचारलं ----
"तुझी जात कुठली?"
तिने उलट त्यालाच विचारलं --
"एक आई म्हणून, की एक स्री म्हणून " ?
तो म्हणाला "ठिक आहे, दोन्ही
म्हणजे -- आई आणि स्री म्हणून सांग. "
तिने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले ---
"स्री जेव्हा 'आई' होते तेव्हा ती जातीहीन असते. "
तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन
विचारता झाला --
" ते कसं काय? "
ती म्हणाली -
" जेव्हा एक आई आपल्या बाळाचं संगोपन करत असते,
ती त्याची शी-शु साफ करत असते, तेव्हा ती शूद्र जातीची असते.
बाळ जसजसं मोठं होत जातं,
तेव्हा आई नकारात्मक गोष्टी आणि अपप्रवृत्तींपासून त्याची रक्षा करते, तेव्हा ती "क्षत्रिय" होते.
जेव्हा मुल आणिक मोठं होत जातं, तेव्हा आई त्याला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवित असते; तेव्हा ती ब्राम्हण जातीची असते.
आणि शेवटी मुलगा शिकून मोठा होतो, कमावू लागतो, तेव्हा तिच आई त्याच्या मिळकत आणि खर्च ह्या विषयी योग्य ते मार्गदर्शन करुन, जमा - खर्चाचा ताळ- मेळ ठिक करते ;
तेव्हा ती आपला 'वैश्य धर्म ' निभावते.
"तर मी काय म्हणते, ते योग्य आहे ना की स्री 'जाती हीन' असते. "
हे तिचे उत्तर ऐकून तो "अवाक" झाला.
त्याच्या डोळ्यात तिच्या व समस्त स्रीयांविषयी आदरयुक्त भावना चमकली, आणि तिला एक आई आणि स्री होण्याचा अभिमान असलेला दिसून आला.