Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Women's Day 2024: महिला जोडीदाराला करून दया खास असल्याची जाणीव, या टिप्स अवलंबवा

Women's Day 2024: महिला जोडीदाराला करून दया खास असल्याची जाणीव, या टिप्स अवलंबवा
, गुरूवार, 7 मार्च 2024 (19:30 IST)
महिलांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी हे सांगणे गरजेचे आहे की, स्त्री खूप खंबीर असते.  याच भावनांच्या अभिव्यक्तीसाठी 8 मार्चला अंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. या दिवशी महिलांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना त्यांचे अधिकार सांगण्यात येतात. तसेच महिलांनी दिलेले योगदान या प्रति समाजाला जागरूक केले जाते. अंतरराष्ट्रीय महिला दिवस या दिवशी तुम्ही पण तुमच्या महिला जोडीदारासाठी हा दिवस विशेष करू शकतात. या दिवशी त्यांना जाणीव करून दया की त्या तुमच्यासाठी किती खास आहे. तर या टिप्स अवलंबवा. 
 
निर्णय घेतांना साथ दयावी- भारतात अनेक महिला या त्यांच्या जीवनाशी संबंधित निर्णय स्वता घेत नाही. तर निर्णय घेतांना पुरुषांची परवानगी घेते. तसेच काही ठिकाणी आत्मनिर्भर महिलांची देखील हीच स्थिति आहे. तसेच तुमच्या महिला जोडीदाराला ही जाणीव करून दया की, महिला देखील पुरुषांपेक्षा कमी नाही. त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करा व प्रत्येक निर्णयात त्यांची साथ दया. 
 
आवड-नावड जपावी- कुठल्याही महिलेसाठी ही आनंदाची गोष्ट असते की तिचा जोडीदार तिची आवड जपतो व तिच्या आवडीकडे लक्ष देईल. आपल्या समाजात प्रत्येक महिला मग ती आई असो किंवा पत्नी, बहिण पूर्ण कुटुंबाची आवडनावाड जपते असते. पण तुम्ही तुमच्या कुटुंबातील महिलांची आवड जपतात का? 
 
भेटवस्तू दयावी- जोडीदाराला ते स्पेशल असल्याची जाणीव करून देण्याकरिता भेटवस्तू दयावी. तुमच्या जोडीदाराला अचानक भेटवस्तू दया किंवा त्यांना आवडणारी वस्तु भेट म्हणून दया. 
 
भावना तसेच म्हणणे घ्यावे- तुमच्या महिला जोडीदारला त्यांचे तुमच्या आयुष्यात किती महत्व आहे.  याकरिता त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठया गोष्टी समजून घ्याव्या जस की तुमची जोडीदार तुमच्या सोबत बोलत असेल तर शांतिपूर्वक म्हणणे ऐकावे मध्येच टोकू नका किंवा थांबवू नका. यामुळे तुमच्या महिला जोडीदारात आत्मविश्वास वाढेल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे लाल फळ करेल Cholesterol- BP या आजरांवर मात, दररोज फक्त 50 ग्रॅम खा