Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशी होती माझी आई

- प्रा. प्रमिला देशपांडे

अशी होती माझी आई
अशी होती माझी आई -
फार फार साधी, सरळ, प्रेमळ
आरपार स्वच्छ नितळ -

सहजता तिच्या रोमारोमात होती.
निष्पापता रंध्रारंध्रातून ठिबकत होती,
सत्तरीतही ती बालक होती,
बालकच पालक बनून आली होती -

दु:स्वास तिला माहीत नव्हता,
आपपराच्या रेषा उमटल्याच नव्हत्या
मायेची पाखर शरीरधारी झाली होती -
पुण्याई आची आई होऊन आली होती -

आयुष्यात तापत्रयींची गर्दी होती !
सहजभाव शांतता छेदावी म्हणून प्रकृती अशांत होती.
सौम्यता, सम्यकता दृष्यात बांधली होती
ईश्वरी करणी आमच्या वाट्यास आली होती -

सावली बनून नि:संगाची,
आई होऊन अष्टपुत्रांची,
किती काय देऊन -
ऋण सार्‍यांचे फेडून,
करते बरसात केवळ कृपेची !
अशी आमची आई होती.
फार फार साधी, सरळ, प्रेमळ, आरपार नितळ !

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महत्त्व आईचे