Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्या माउलीची व्यथा

त्या माउलीची व्यथा
मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहाँ घेतला. तेवढ्यात तिथे एक 50-55 वर्षाची बाई आली. डोक्यावर भल मोठ जळ्णांच ओझ तिनं बाजुला टाकलं. कुठेतरी एखादा काळा केस, कपळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यंत आलेला, धारदार नाक, सूरकुतलेले हात, तिन-चारजोड देऊन हातानेच शिवलेल नववारी लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता...नुस्तच कालवण मिळल का गं बाई? माझ्याकडं भाकर हाय.

तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईनं शिळी भाकर काढली. आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली. मी विचार करायला लागलो. आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर? इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हॉटेलवाली मुलगी म्हणाली, आजी, मिसळपाव घ्या, पैसे नाही घेणार! पोरी, आज खाईन पोटभरून पण उद्या? ती आजी बाई म्हणाली. तुम्हाला मुलबाळ नाही का? मुलगी म्हणाली. त्यावर त्या म्हणाल्या, तसंनाय काय, पोरगा मोठा सायब हाय, परदेशाला इंजीनियर हाय पण त्याला वेळच न्हाय! कानाखाली कोणीतरी जोराची चपराक मारावी आणि त्याचा आवाज मेंदुपर्यत घुमावा तसे हे शब्दमाझ्या कानावर पडले आणि विचारंच काहूर माजल.

माणूस इतका बदलतो का? आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेणार्‍या या माऊलीची त्याला क्षणभरही आठावण येत नसेल का? आणि सगळच अनुत्तरीत होत. चेहरा खाली घालूत मी आता विचार करीत होता. इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला. मी वरती पाहील तर तिच बाई मला म्हाणाली. इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई -बापाला निट जप म्हणजे झाल.... मगतर मेल्याहून मेल्यासारख झाल. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. कारण एक क्षणात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच थोडसं दुःखसुध्दा कधीच जाणता येत नाही. जिवनाच्या कसोटित एवढं शिक्षण घेऊन आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्या समोर! कुठ शिक्षण घेतलं यांनी हे. सेटलमेंट, न्यू जॉब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन बसतो आम्हालाच कळत नाही. डोक जड झाल. मी उठलो आणि चालू लगलो. शोजारच्या जिल्हापरिषदचे च्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते. आपण काय शिकलो? मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर नाही होताआल तरी चालेल पण चांगला, जबाबदार माणूस जरूर व्हायच.... 

- मयंक   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी कविता : झूलाघर