Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mother's Day 2026 wishes in Marathi मदर्स डे शुभेच्छा

Mother's Day 2026 wishes in Marathi
कोठेही न मागता, 
भरभरून मिळालेलं दान,
म्हणजे आई...
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान,
म्हणजे आई...
हॅपी मदर्स डे!
 
आई, तुझ्या मायेच्या सावलीत मी सदैव सुखी राहतो
माझ्या जगण्याला अर्थ देणाऱ्या माझ्या प्रिय आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!
 
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, 
म्हणून त्याने तुला निर्माण केलंय आई! 
Happy Mother's Day!
 
माझ्या प्रत्येक यशाच्या मागे तुझा हात आहे आई! 
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर कवितेला मातृदिनाच्या शुभेच्छा
 
आई म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप 
आणि वात्सल्याचा अखंड झरा
माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात 
ढाल बनून उभी राहिलेल्या माझ्या आईला 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
कितीही मोठी संकटे आली तरी 
ज्याच्या पदराखाली सुरक्षित वाटते, 
ती म्हणजे 'आई' 
जगातील सर्व मातांना 
मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!
 
घर हसते तेव्हा जेव्हा आई हसते
आमच्या घराचा आधारस्तंभ
आणि आमचे सर्वस्व असलेल्या 
आईला मातृदिनानिमित्त खूप खूप प्रेम
 
स्वतः उपाशी राहून मुलांचे पोट भरणारी 
आणि पदराखाली सर्वांचे दोष झाकणारी 
फक्त आईच असू शकते
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई!
 
देवाकडे काही मागण्याची गरजच पडली नाही,
कारण त्याने मला जगातील सर्वात सुंदर 
आणि समजूतदार आई दिली आहे
हॅप्पी मदर्स डे!
 
आई, तू माझ्यासाठी केवळ सावली नाहीस, 
तर कडक उन्हात मिळणारा गारवा आहेस
तुझ्या प्रेमाची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही
मातृदिनाच्या शुभेच्छा!
 
शब्दांत वर्णन करता येणार नाही 
असे पवित्र नाते म्हणजे 'आई'
माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या 
माझ्या माऊलीला मातृदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा
 
आई म्हणजे साक्षात परमेश्वरच! 
जिच्या चरणी स्वर्ग आहे, 
अशा माझ्या लाडक्या आईला 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
माझे पहिले गुरु, माझी पहिली मैत्रीण 
आणि माझा सर्वात मोठा आधार तूच आहेस आई
तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
घरात कितीही माणसे असली तरी 
आईशिवाय घर रिकामे वाटते
आई, तू आहेस म्हणून आम्ही आहोत
हॅप्पी मदर्स डे!
 
कधी प्रेमळ माउली तर कधी कडक शिस्तीची शिक्षिका... 
आई, तुझ्या प्रत्येक रूपाने मला घडवले आहे
तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!
 
जगासाठी तू एक व्यक्ती असशील,
पण माझ्यासाठी तू संपूर्ण जग आहेस
आई, नेहमी अशीच हसत राहा
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
आईच्या हाताची चव आणि 
तिने दिलेल्या मायेची ऊब 
जगात कुठेच मिळत नाही
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या 
स्त्रीला मातृदिनाच्या शुभेच्छा
 
तू दिलेली संस्कारांची शिदोरी 
मला आयुष्यात नेहमीच मार्ग दाखवत राहील
थँक्यू आई, माझ्यासाठी सर्व काही केल्याबद्दल! 
मातृदिनाच्या शुभेच्छा
 
आई, तुझे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही, 
पण तुझे नाव नेहमी अभिमानाने घेईन
तुला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Cake Recipe आईसाठी मदर्स डे निमित्त स्वतःच्या हाताने केक बनवण्यासारखा दुसरा आनंद नाही