Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आईसारखी आईच

आईसारखी आईच
खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते.

असे म्हटल्या जाते, की 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवनहे खर्‍या अर्थाने जीवनच नाही. सर्वश्रेष्ठ ही फक्त एक नारी नसून एक सक्षात देवता आहे. "आई शब्दाचा तिचा खरा अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई.

इतक्यात कुठेतरी ऐकण्यात आले कि..... आणि खरंही आहे ते अवघ्या ब्रम्हांडाची सत्ता पाहणारा तो एक्टा काय पाहणार? यावर उपाय म्हणून त्याने सर्वप्रथम आई बनविली असे वाटते, यात त्याचादेखिल स्वार्थ असावा, कारण ब्रम्हांडातून एक व्यक्ती पृथ्वीवर पाठवायला त्याला फारसे कष्टही पडत नाही अणि त्याच्या जबाबदार्‍याही झटकल्या जाऊ शकतात. याशिवाय त्याच्या मुख्य स्वार्थ म्हणजे व्यक्ती एक भूमिका अनेक याचाही साकार होतो.

खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. अगदी आईपासून ते आईपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात डोकावून पाहाल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते सुसंस्काराचे घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.

तुमच्या आमच्या जीवनात आईच्या सहवासात राहताना कधी आईच रहस्य आपण जाणूनच घेतले नाही. खरच तिच्याकडे एकदा शांतचित्ताने डोकावून पाहाल तर तिच्या स्मित हास्यात नक्कीच ईश्वराची प्रतीमा तुम्हाला दिसेल. हा माझा ठाम विश्र्वास आहे.

आईच्या सहृदयतेबाबातची कथा सर्वानाच ठाऊक आहे, ती की ठेच लागुन पडलेल्या मुलाला त्याच्या हातात असलेले आईच काळजी देखील विचारते, की बेटा तुला काही लागले तर नाही ना? यावरून आईचे काळीज आपल्या मुलाची किती काळजी घेते तर मग प्रत्यक्ष जीवनातली आई किती श्रेष्ठ असेल याची अनुभूती येते. पुत्र हा कधी ही कूपुत्र होवू शकतो, परंतु आई कधी कूमाता होवू शकत नाही. म्हणूनच म्हटल्या जाते की आईसारखी आईच....!  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पॉवर वाढवा अगदी सोप्या घरगुती पदार्थांनी