Publish Date: Sun, 12 May 2024 (05:21 IST)
Updated Date: Sun, 12 May 2024 (10:18 IST)
आधार, हा शब्दच कित्ती उभारी देऊन जातो,
जगण्याची इच्छा न ऊर्जा आपोआपच वाढवतो,
माहिती असतं आपल्यास, की वेळ आली की आधार मिळेल,
कुणीतरी आपल्याला उचलून धरेल,
खचत नाही मग हिम्मत,कशीही येवो परिस्थिती,
त्या मदतीचे आसपास असणं , फक्त त्याची उपस्थिती.
अन आधार नसेल तर, अधांतरी वाटतं,
काही करू शकू आपण, दुरापास्तच दिसतं.
नाजूकश्या वेलीला भरभक्कम आधार झाडाचा
आईवडिलांची छत्रछाया,आधार आपल्या जीवनाचा,
बस्स एवढं असलं की जग जिंकता येते,
बिना पंखानेच आकाशात भरारी घेता येते.!