Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी
आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी 
औषधावर दिलेली लिमलेटची गोळी
 
आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखरेचा खडा
शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा
 
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात
 
आई म्हणजे देव्हाऱ्यातील लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र
- शांता शेळके

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चेहऱ्यावरील जुने डाग काढण्यासाठी घरीच बनलेला सिरम वापरा, सिरमचे फायदे जाणून घ्या