मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर आल्याने पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद गिलानी यांना फोन करून या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या प्रमुख अधिका-याला भारतात पाठविण्याची मागणी केली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारानुसार गुन्ह्यांच्या तपासासाठी दोन्ही देशातील गुप्तचर संस्थांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे निश्चित झाले आहे. त्या करारानुसार या हल्ल्याच्या तपासासाठी आयएसआयच्या अधिका-याला भारतात पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. या अधिका-याकडे हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याचे पुरावे सादर केले जाणार आहेत.