एक जिवंत दहशतवादी एनएसजीच्या ताब्यात
ताजमध्ये एक दहशतवादी जखमी अवस्थेत
हॉटेल ताजमध्ये कमांडोचे ऑपरेशन अद्याप सुरू आहे. एनएसजीच्या कमांडोने एक जिवंत दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. एनएसजीच्या मुख्य सुत्रांनी माहिती दिली की, ताब्यात घेतलेला दहशतवादी आहे किंवा नाही याची पुष्टी झालेली नसल्याचे त्यांनी सांगतिले आहे.
ताजमध्ये आणखी एक जखमी दहशतवादी असल्याची शक्यता येथे वर्तवण्यात आली आहे. ताज हॉटेलला आग लागली असून काळ्या धूराचे लोट मोठ्याप्रमाणात बाहेर फेकले जात आहे. आग विझविण्याचे कार्य फायरब्रिगेड कर्मचारी करत आहेत.