Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहशतवादीच वेटर म्हणून काम करत होते?

दहशतवादीच वेटर म्हणून काम करत होते?
मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (15:47 IST)
देशाची आर्थिक राजधानीवर गेल्या तीन दिवसांपूर्वी हल्ला चढविलेले दहशतवादी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असावेत, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हॉटेल ताज, ओबेरॉय व नरीमन हाऊसमध्ये घुसून ओलिसांना वेठीस धरणारे अतिरेकी हे गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत वास्तव्यात असल्याची माहिती समोर आली आहे. नरीमन हाऊसच्या शेजारी राहणार्‍या नागरिकांनी असे सांगितले आहे की, गेल्या दोन महिन्यांपूर्वी काही तरूण मुले नरीमन हाऊसच्या शेजारच्या खोल्यामध्ये राहत होते. ते दहशतवादीच असतील असे त्यांनी पोलीसांना सांगितले आहे. हॉटेलची परिपूर्ण माहिती त्यांना कशी मिळाली असावी हा मुद्दा पुढे आल्याने ते या हॉटेलमध्ये वेटर व इतर कर्मचारी म्हणून काम करत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने विदेशी नागरिक येत असतात. त्यामुळे त्यांदी देशात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने मुंबईतल्या हॉटेल ताज, ओबेरॉय व नरीमन हाऊस यांनाच दहशतवाद्यांनी टार्गेट केल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi