दहशतवादी मुंबईत मोठ्या हल्ल्याच्या उद्देशाने आले होते. मुंबईत हल्ले करून त्यांना किमान पाच हजार लोकांना लक्ष्य करायचे होते, अशी धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली आहे.
गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दहशतवादी कारवायांच्या संदर्भात माहिती देताना सांगितले, की या हल्ल्यात आतापर्यंत 183 लोक मृत झाले असून सुमारे 610 जण जखमी झाले आहेत. तर 530 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.