मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात तेरा परदेशी नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. शिवाय बावीस जण जखमी झाले आहेत.
केंद्रीय गृह विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत आठ परदेशी नागरिक आहेत. पण यात नरीमन हाऊसमध्ये मारल्या गेलेल्या पाच इस्त्रायली नागरिकांचा समावेश नाही. या पाच जणांच्या मृत्यूला एनएसजीचे प्रमुख जे. दत्ता यांनी दुजोरा दिला आहे.
मृतांमध्ये तीन जर्मन, जपान, कॅनडा व ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एक नागरिकाचा समावेश आहे.