मुंबईत एनएसजीचे 200 जवान दाखल
ताजमध्ये अजूनही चकमक सुरूच
पोलिस, लष्कर, आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाचे अर्थात एनएसजीचे जवान मुंबईत दाखल झाले असून, आता पर्यंत ताजमधून जवळपास 150 नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे.
ताज आणि ओबेरॉयमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एनएसजीचे 200 जवान मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी ताजला वेढा दिला आहे.
आज सकाळपासून पुन्हा ताजमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला असून, याला लष्करी जवानांनी आणि एनएसजीच्या कमांडोंनी दिलेल्या प्रत्योत्तरात दोन दहशतवादी मारल्या गेल्याचे पोलिसांनी स्पष्ट झाले आहे.