एकीकडे हॉटेल ओबेरॉय व ताजमध्ये जोरदार कमांडो कारवाई सुरू असतानाच मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पुन्हा जोरदार गोळीबार सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या भागातूनच बुधवारी रात्री गोळीबारास सुरुवात झाली होती. आता पुन्हा या भागातून गोळीबार सुरू झाल्याने सुरक्षा दलांची काळजी आणखी पुन्हा वाढली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे मुंबईतील गजबजलेले रेल्वे स्टेशन असून या भागात हजारो लोक अडकून पडले आहेत. या संपूर्ण भागाला सुरक्षा दळांनी विळखा घातला आहे.