Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे काय चाललंय?

हे काय चाललंय?

वेबदुनिया

, सोमवार, 3 मे 2010 (13:09 IST)
देशात दहशतवादी बॉम्बस्फोटांची मालिका सुरू असताना मुंबई मात्र तेव्हा शांत होती. पण ही शांतता वादळापूर्वीची होती हे आजच्या हल्ल्याने स्पष्ट झाले. देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील ज्या वेगाने कपडे बदलतात, त्याहीपेक्षा वेगाने दहशतवादी या देशात स्फोट घडवू शकतात हे आता सिद्ध झाले आहे. आता गृहमंत्री काय विधान करतील हे सांगण्याचीही गरज उरलेली नाही. कारण चावून चोथा झालेले विधान आता लोकांनाही पाठ झालेले आहे.

आतापर्यंत देशाच्या राजधानीपासून ते आर्थिक राजधानीपर्यंत दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. मुंबईतला आजचा हल्ला तर अतिरेक्यांची बदललेली कार्यपद्धतीही दर्शवतो. अंदाधुंद गोळीबार करणारा आत्मघातकी हल्ला त्यांनी यावेळी केला. जोडीला बॉम्बस्फोटही घडवले. अंदाधुंद गोळीबाराने गोंधळ निर्माण करून जास्तीत जास्त लोकांना ठार करण्याचे हे अतिरेक्यांचे षडयंत्र होते. दुर्देवाने ते त्यात यशस्वी ठरले असेच म्हणावे लागेल. सुरक्षा यंत्रणा नेहमीप्रमाणे विफल ठरल्या आहेत. दहशतवादी कारवायांचा अंदाजच त्यांना आला नाही.

जे काही घडत होते त्यावरून काय चालले आहे ते कळतही नव्हते. यावरून अतिरेक्यांनी केलेला प्लॅन यशस्वी ठरल्याचे दिसते. हा देश आता अजिबात सुरक्षित राहिलेला नाही. तुम्ही दिल्लीत, असा अहमदाबादमध्ये, बंगलोरमध्ये, आसाममध्ये वा मुंबईत तुम्ही सुरक्षित नाही. या देशात दहशतवादी कुठेही अगदी सांगून हल्ला घडवू शकतात. पोलिसांसह सगळ्या सुरक्षा यंत्रणाही हतबल ठरल्या आहेत. सरकारची हतबलताही दिसून येते. थोडक्यात आपणही असुरक्षित ठरलो आहोत.

Share this Story:

Follow Webdunia marathi