Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

.... आला पण सिंह गेला

.... आला पण सिंह गेला
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिस आणि जवानांना यश आले असले तरी महाराष्ट्र पोलिस दलातील हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या तीन सिहांना शहीदत्व प्राप्त झाले. गड आला पण, सिंह गेला अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही भरपई कधीही न भरून येणारी आहे. दहशतवादाचे समुळ उच्चांटन करणेच त्यांना ख-या अर्थाने श्रध्दांजली ठरणार आहे.


आपल्या प्राणांची पर्वा न करता निधड्या छातीने दहशवाद्यांसमोर जाणा-या या तीन सिंहांना लपून बसलेल्या भ्याड दहशतवाद्यांनी ठार मारले. पोलीस दलात सेवा करताना आक्रमक असणा-या या तिघांना विरमरण प्राप्त झाले असले तरी देशाने तीन खंद्या अधिका-यांना गमावले आहे, हे देखील तितकेच खरे आहे.

अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर शनिवारी दादर येथे भावपुर्ण वातावरणात हेमंत करकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. हे अधिकारी आपल्यात नाहीत, याच्यावर अजूनही विश्वास बसत नाहीय. त्यांचे विरमरण देश कायमस्वरूपी स्मरणात ठेवेलच पण, दहशतवादाबद्दल कमालीची चिड असणा-या या अधिका-यांना ख-या अर्थाने श्रध्दांजली वहायची असेल तर दहतवाद उघडून टाकणे गरजेचे आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi