Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

58 तासानंतर मुंबईची मुक्तता

ऑपरेशन सायक्लोन यशस्वी:तिनशेहून अधिक बळी

58 तासानंतर मुंबईची मुक्तता
मुंबईत बुधवारी रात्री 9.40 वाजता सुरू झालेला थरार तब्बल 58 तासानंतर शनिवारी सकाळी 8.15 वाजता संपला आणि दहशतवाद्यांच्या तावडीतून मुंबईची सुटका झाली. हॉटेल ताजमध्ये शनिवारी सकाळी जोरदार चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून कमांडोंनी 'सायक्लोन' ऑपरेशन यशस्वी केले. दोन दिवस चाललेल्या या चकमकीमध्ये तिनशेहून अधिक निष्पापांसह धाडसी अधिकारी आणि कमांडोचा बळी गेला आहे.

बुधवारी रात्री मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांनी महत्वाच्या 11 ठिकाणांवर हल्ले करत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. त्यांचा हा थरार दोन दिवस चालेल असे कुणाच्या स्वप्नवतही नव्हते. ताज, ओबेरॉय आणि नरीमन हाऊमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी एके47 ने जोरदार गोळीबार आणि ग्रॅनाइटचे स्फोट घडवून दहशत माजवली. हॉटेलमधील नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न असल्याने कमांडोंना सावधपणे ऑपरेशन राबवावे लागले. गेले दोन दिवस तिनही ठिकाणी जोरदार चकमकी सुरू होत्या. दहशतवाद्यांनी ग्रॅनेडचा स्फोट घडवून दहशत माजविण्याचाप प्रयत्न केला. शुक्रवारी नरीमन हाऊसमध्ये झालेल्या जोरदार चकमकीनंतर कमांडोंचे मिशन फत्ते होते तोच ताजमध्ये पुन्हा स्फोट आणि चकमक सुरू झाली.

शुक्रवारी रात्रभर ताजमध्ये चकमक सुरू होती. रात्री उशीरा कमांडोंची जादा तुकडी ताजमध्ये घुसली आणि दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू झाला. कमांडोंनी विळखा कसल्याने हबकलेल्या दहशतवाद्यांनी ग्रॅनाइटचे स्फोट घडवून आणले. शनिवारी सकाळी जोरदार गोळीबार सुरू होता. अचानक मोठी आग आणि काळा धूर पसरल्याने संभ्रम निर्माण झाला पण, सकाळी 8.15 च्या सुमारास ऑपरेशन फत्ते करून कमांडो ताजच्या बाहेर आले. एका ‍दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात कमांडोंना यश आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi