'आता पाकिस्तानवर हल्ला करा'
नागरिकांचा सरकारवर आक्रोश कायम
केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पाक विरोधात केंद्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी देशात जोर धरत आहे.
मुंबईत झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकचा हात असल्याचे पुरावे सरकारला मिळाले असून, केंद्र आणि राज्य सरकारने याला दुजोरा दिला आहे.
ताजमध्ये जखमी झालेल्या एका दहशतवाद्याने यात पाकमधील लष्कर ए तैय्यबाचा हात असल्याचे कबूल केले असून, यानंतर भारत सरकारने पाककडे नाराजी व्यक्त केली आहे.
देशात झालेल्या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सरकारी अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले असले तरी आता याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कॉग्रेस सरकारने पाकविरोधात कोणताही निर्णय घेतला तर त्याला आपण पाठिंबा देऊ असे भारतीय जनता पार्टीन जाहीर केले असून, सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे.