गेल्या 40 तासांपेक्षाही अधिक वेळेपासून मुबईसह देशाला वेठीस धरून ठेवलेल्या दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी एनएसजीच्या कमांडोंनी 'ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो' सुरू केले आहे. या ऑपरेशनची मिनिट टू मिनिट माहिती वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी 'वेबदुनिया न्यूज डेस्क' गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने कार्यरत आहे.
नरीमन हाऊसमध्ये सुरू असलेल्या कारवाईची ही 'मिनिट टू मिनिट' माहिती-
सकाळी 8.05 वाजता
दक्षिण मुंबईतील नरीमन हाऊसमधून दहशतवाद्यांख खात्मा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) जवानांनी कारवाईला सुरूवात केली. एनएसजीच्या तीन हेलीकॉप्टरने 32 कमांडो नरीमन हाऊसच्या छतावर उतरले. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण असलेल्या कमांडोंच्या मदतीसाठी जमीनीवरूनही कमांडो पथकाने कारवाईस सुरूवात केली.
सकाळी 8.15
दहशतवाद्यांकडून गोळीबार व ग्रेनेडचा वापर. एक कमांडो जखमी
सकाळी 8. 17
सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी नरीमन हाऊसमध्ये आपल्या जवानांपर्यंत पोचले.
8.20 वाजता
एनएसजीचे आणखी एक हेलीकॉप्टर नरीमन हाऊसवर उतरविण्यात आले. हे हेलिकॉप्टर सातत्याने ताज, ओबेरॉय आणि नरीमन हाऊसवर घिरट्या घालीत आहे.
8.39 वाजता
नरीमन हाऊसमध्ये किमान दोन दहशतवादी असल्याची सेनादलाच्या अधिका-यांची माहिती. काही वेळ लागण्याचे संकेत. दोन्ही बाजूने गोळीबार सुरूच.
9.25 वाजता
एनएसजीचे कमांडो नरीमन हाऊसचया दुस-या मजल्यावर पोचले. दहशतवाद्यांचे गोळीबार आणि बॉम्बस्फोट सुरूच. नरीमन हाऊसमध्ये निर्णायक कारवाई सुरू प्रशासनाने नरीमन हाऊसपासून माध्यमांच्या प्रतिनिधी आणि पत्रकारांना दूर केले.