Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डेक्‍कन मुजाहिद्दीन व इंडियन मुजाहिद्दीन एकच

डेक्‍कन मुजाहिद्दीन व इंडियन मुजाहिद्दीन एकच

वेबदुनिया

, सोमवार, 3 मे 2010 (13:54 IST)
मुंबईतील आजवरच्‍या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारणारी डेक्‍कन मुजाहिद्दीन ही संघटना इंडियन मुजाहिद्दीनचेच दुसरे रूप असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. तर इंडियन मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटनाही सिमीचेच रूप आहे हे यापूर्वीच स्‍पष्‍ट झाले आहे.

सिमी व इंडियन मुजाहिद्दीन या संघटनांनी देशभर केलेल्‍या स्‍फोटानंतर या संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर या संघटना काही दिवस शांत होत्‍या त्‍या कदाचित या हल्‍ल्‍यासाठीच.

मुंबईत 26 नोव्‍हेंबरच्‍या रात्री झालेल्‍या हल्‍ल्‍याची जबाबदारी डेक्कन मुजाहिद्दीन या संघटनेने घेतली आहे. डेक्‍कन या शब्‍दाचा अर्थ दक्षिण असा होतो. दक्षिणेतील महाराष्‍ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्‍यातील दहशतवादी या संघटनेत सहभागी असल्‍याची माहिती समोर आली आहे. तर Deccan च्‍या 'डी' चा अर्थ दिल्‍ली, सी- कोलकाता, सी- कटक, ए- अहमदाबाद व एन- नागपूर असाही आहे.

तर मुजाहिद्दीन या अरबी शब्‍दाचा अर्थ अशी मुस्लिम व्‍यक्‍ती जी जिहादमध्‍ये सहभागी झालेली असते. इंडियन मुजाहिद्दीनच्‍या दक्षिण भागाच्‍या क्षेत्रातील अतिरेक्‍यांचीच ही एक संघटना आहे.

वाचा इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेची माहिती

Share this Story:

Follow Webdunia marathi