सरकार देशावरील सर्वप्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांना परखड उत्तर देण्यास सक्षम असल्याचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
मुखर्जी यांनी सांगितले, की 'मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यात आमचे सुरक्षा बळ पूर्णपणे सक्षम आहे. येथे कारवाई सुरू आहे. काही लोकमध्ये अडकून पडल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी वेळ लागू शकतो.'