दहशतवाद्यांकडे चीनमध्ये तयार झालेले ग्रेनेड मिळाले असून मॉरीशसचे ओळखपत्रे मिळाल्याची माहिती नौसेनेच्या अधिका-यांनी दिली आहे.
नौसेनेच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर दारूगोळा असून त्यांच्याकडे चीनमध्ये तयार करण्यात आलेले ग्रेनेड सापडले आहे. तर अनेक बँकांचे क्रेडीट कार्डही त्यांच्याकडे आढळून आले आहेत. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर भारतीय रुपये व डॉलरही आढळून आले आहेत.