Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाक लागला युद्ध तयारीला

पाक लागला युद्ध तयारीला

वेबदुनिया

नवी दिल्ली , सोमवार, 3 मे 2010 (16:17 IST)
मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हाल्ल्यांनंतर भारत आणि पाक या उभय देशांच्या संबंधांमध्ये आता मिठाचा खडा पडला असून, या धास्तीने पाकने अफगाण सीमेवर तैनात केलेले आपले सैन्य भारतीय सीमेवर हालवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत.

हे सैन्य म्हणजे तालिबानी लडाकू असल्याचे मत भारतीय सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केले असून, भारत सरकारने वेळीच यावर निर्णय न घेतल्यास भारतीय सीमा कायमच्या अशांत होण्याची भीती या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत झालेल्या स्फोटांमध्ये पाकचा हात असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर भारत सरकारने उघड उघड पाकविरोधात नाराजी व्यक्त केल्याने पाक सरकारने धास्तीने हा निर्णय घेतला असून, पाकसरकारमध्ये बेचैनी असल्याचे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi