Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
नवी दिल्ली (एएनआय) , सोमवार, 3 मे 2010 (16:00 IST)
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिलाच दहशतवाद्यांनी 'टार्गेट' केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आगामी काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी भलताच कठीण असला तर नवल वाटू नये. अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांचेही तेच मत आहे.

जागतिक आर्थिक पेचप्रसंगाने भारताचा आर्थिक विकास दर हळूहळू मंदावतोय. रूपयाची किंमत घसरतेय. अशा परिस्थितीत दहशतवादी हल्ला झाल्याने परकीय गुंतवणूकदार व उद्योगपती गुंतवणूक करताना सावध रहातील, असा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे.

अर्थव्यवस्थेला नक्कीच धक्का बसेल, असे फर्स्ट ग्लोबल या फायनान्शियल रिसर्च संस्थेचे हितेश कुवळेकर यांनी सांगितले.

पण देशाचे उद्योगमंत्री कमलनाथ यांनी मात्र या हल्ल्यांचा दीर्घकाळ परिणाम होणार नाही असे सांगितले. आता जगात सगळीकडेच दहशतवादाचा धोका आहे, हे सगळ्याच उद्योगपतींनी मान्य केले आहे. त्यामुळे ही भीती कुठेही गेले तरी आहे, हे त्यांनीही लक्षात घेतले आहे, याकडे कमलनाथ यांनी लक्ष वेधले.

पर्यटनावरही याचा मोठा परिणाम आहे. या घटनेमुळे पर्यटक घाबरले आहेत. असे उद्योग विश्लेषक मॅथ्यू ब्रुक्स यांनी सांगितले. दहशतवाद हाच मोठा प्रश्न तुमच्यासमोर भेडसावणार असेल तर हा नक्कीच मोठा प्रश्न आहे, असे ब्रुक्स यांनी सांगितले.

कमलनाथ यांच्या मते हा एक अपवाद आहे. तो काही नियम नाही. हे एकदा घडले म्हणजे सदोदीत हेच घडत राहील असे नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi