देशावर आणि मुंबईवर संकट आले असून, आपण आपले पद सोडणार नसल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत झालेल्या स्फोटांनंतर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, यानंतर आर आर पाटील यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी होत आहे. परंतु आज आबांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.