Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

मुंबई हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

भाषा

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी कोलकता पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अतिरेक्यांसाठी या दोघांनी बनावट कागदपत्रे सादर करून दोन सीमकार्ड मिळवली होती.

यातील एकाला पोलिसांनी काश्मिरमधून तर दुसर्‍याला कोलकतामधूनच अटक करणअयात आली आहे. उपायुक्त जावेद शमीम यांनी ही माहिती दिली. कोलकता व परिसरातून गेल्या दोन महिन्यात ३७ सीम कार्ड बनावट कागदपत्रे सादर करून मिळवण्यात आली आणि ती पाकिस्तानला पाठविण्यात आली आहेत. त्यातलीच काही मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांनी वापरल्याचा अंदाज आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात सीम कार्ड मिळविणे हा एखाद्या मोठा दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा भाग असावा असा पोलिसांचा कयास आहे. ही सीमकार्ड काश्मीरमार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ही कार्ड पाकिस्तानातील पार्क स्ट्रीट, नॉर्थ २४ परगण्यातील बसिरहट व साऊथ २४ परगण्यातील संतोषपूर येथून मिळविण्यात आली आहेत. सीम कार्ड देणार्‍या दुकानदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कार्ड जादा पैसे देऊन विकत घेण्यात आली आहेत.

मुंबई पोलिसांनाही दहशतवाद्यांकडील पाच सीम कार्डे मिळाली आहेत. ती सगळी पश्चिम बंगालमधील आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi