ठाण्यात नौकरी लावण्याचे आमिष दाखवत 10 जणांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ठाणे शहरात सरकारी रुग्णालयात नौकरी देण्याचे आमिष दाखवत एका टोळीने 10 जणांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी पीडितांना सरकारी रुग्णालयाच्या एक्सरे बिलिंग विभागात नौकरी देण्याचे आश्वासन देत जानेवारी 2023 पासून ऑनलाईन पैसे घेत होते. या प्रकरणात दहा जणांची 13.4 लाख रुपयांची फसवणूक केली.
आरोपींनी विश्वास बसावा म्हणून ठाणे महापालिका आयुक्तांनी दिलेले ऑफर लेटर, ट्रेनींग आणि जॉइंनिंग लेटर अपाईंटमेन्ट लेटरची बनावट कागदपत्रे तयार केली होती.
या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात घेता पिडीतांनी सरकारी कार्यालयात संपर्क साधत कागदपत्रांची सत्यता पडताळली तेव्हा हे उघडकीस आले. आणि प्रकरणाचा तपास सुरु झाला. पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.