Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 100 प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या होणार

आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 100 प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या होणार
, मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (10:03 IST)
आफ्रिकेतून मुंबईत दाखल झालेल्या 100 प्रवाशांची पुन्हा चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. गेल्या 15 दिवसांत आफ्रिकेतल्या देशांतून एकूण 466 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.
यापैकी 100 जण मुंबईचे आहेत तर 366 प्रवासी मुंबईबाहेरचे असल्याचं म्हटलंय.
मुंबईतलया 100 प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यापैकी कोणालाही कोव्हिड -19 झाला नव्हता. पण दक्षता म्हणून या प्रवाशांच्या पुन्हा एकदा चाचण्या करण्यात येणार आहेत.
ठाण्यामध्ये दाखल झालेल्या 7 प्रवाशांचाी शोध घेण्यात येणार असून त्यांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान अद्याप भारतामध्ये ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत Omicron चा धोका : 15 दिवसांत आफ्रिकन देशातून 1000 प्रवासी आले, फक्त 466 नावे सापडली, फक्त 100 लोकांची चौकशी