Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 9 March 2025
webdunia

मुंबईमध्ये 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या

suicide
, शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (11:45 IST)
महाराष्ट्रातील मुंबईत माहीममध्ये 17 वर्षीय एका तरुणीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या अधिकरींनी सांगितले की, तिने कापड बाजारातील बुरहानी हवेली मध्ये फाशी लावून घेतली आहे. ती मागील दोन वर्षांपासून नैराश्य मधून जात होती व त्यावर उपचार घेत होती. तेव्हा पासून ती घरातच राहत होती. डिप्रेशनमुळे तिला पॅनिक अटॅक येत होते.  
 
मिळालेल्या माहितीनुसार ती तिच्या बहिणीला म्हणाली की, माझी प्रकृती ठीक नाही आहे. तसेच तिच्या बहिणीचे घर तिच्या घरापासून जवळ आहे व मृत तरुणीची आई कामासाठी बाहेर गेली होती. त्यावेळेला तिने हे पाऊल उचलले असे पोलीस अधिकारींनी सांगितले आहे. तसेच माहिमपोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी मुंबईत NCP नेत्याची हत्या, अजित पवारांना धक्का