Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत आठवडाभरात २७९ पोलिस बाधित; आतापर्यंत १०१ जणांचा मृत्यू

मुंबईत आठवडाभरात २७९ पोलिस बाधित; आतापर्यंत १०१ जणांचा मृत्यू
, गुरूवार, 15 एप्रिल 2021 (15:25 IST)
महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पोलिसांना वेठीस धरले आहे.  मुंबईत एका आठवड्यात २७९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचवेळी, कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १०१ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
 
मुंबईतील सुमारे ७० टक्के पोलिसांना कोरोना ही लस मिळाली असली तरीही मोठ्या संख्येने पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे.  रविवारी कोरोनाला लस घेतलेल्या एका पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला.  ११ एप्रिलपर्यंत मुंबईत ७८९६ पोलिसांना संसर्ग झाला आहे.
 
उपचारानंतर ७४४२ पोलिसांना सोडण्यात आले असले तरी ४५४ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.  पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ११ एप्रिलपर्यंत ३०७५६ पोलिसांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.  यामध्ये २६९० पोलिस अधिकारी आणि २८०६६ पोलिसांचा समावेश आहे. त्याशिवाय सुमारे १७३५१ पोलिसांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे.  दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये १३२५ पोलिस अधिकारी आणि १६०२६ पोलिस हवालदार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय, हे कुण्या येरा-गबाळ्याचं काम नाही - अजित पवार