Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेप्टिक टँकमध्ये पडून 3 कामगारांचा मृत्यू

सेप्टिक टँकमध्ये पडून 3 कामगारांचा मृत्यू
, शुक्रवार, 11 मार्च 2022 (09:37 IST)
कांदिवलीमधील एकता नगरमध्ये सफाईचे काम करताना तीन कामगार सेप्टिक टँकमध्ये पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
एकता नगर परिसरातील चारकोप लिंक रोडवर स्वच्छतेचं काम सुरू असताना गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास तीन कामगार सेप्टिक टँकमध्ये पडले. स्थानिकांनी लगेच याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. नंतर स्थानिकांच्या मदतीने सेप्टिक टँकमध्ये पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असतानाच तीनही कामगारांचा मृत्यू झाला.
file photo

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मलिक यांनी अटकेला आव्हान देण्याऐवजी नियमित जामिनासाठी अर्ज करावा