Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईतओला चालकाने 8 जणांना उडवलं, ओला चालकाला अटक

accident
, बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (18:00 IST)
मुंबईत घाटकोपरच्या सुधा पार्क परिसरात एका ओला चालकाने 8 जणांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन रिक्षा एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना या ओला चालकाने उडवल्याने परिसरात खळबळ उडाली असून अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. या ओला चालकाला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. या अपघातांमागील कारण अद्याप कळू शकले नाही. 

अपघातात 8 जण जखमी झाले असून त्यात 3 विद्यार्थ्यांचा समावेश असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, हा ओलाचालक रस्त्याने चालत असताना त्याचा वाहनाने अचानक वेग घेतला आणि रस्त्यावर उभारलेल्या सर्वाना उडवत गेला. या अपघात अनेक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ओलाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाची चौकशी करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कबड्डीपटूंना टॉयलेटमध्ये जेवण दिल्याचा व्हिडिओ व्हायरल, क्रीडा अधिकारी निलंबित